पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आंतरराष्ट्रीय खेळाडू जयदेव म्हमाने यांचे कौतुक व शाब्बासकी
मुंबई: दि. १० फेब्रुवारी २०२३ शुक्रवार रोजी ठिकाण मुंबई येथे सायंकाळी 7:00 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटीसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू जयदेव घनश्याम म्हमाने यांना आमंत्रित केले होते. त्यांनी मागील तीस वर्षाच्या खेळाच्या कारकिर्दीमध्ये २१ देशांच्या विविध स्पर्धांमध्ये विशेष करून ज्यामध्ये एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड चॅम्पियनशिप व इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा मुख्यत्वे वर्ल्ड कंबाट गेम आणि एशियन इनडोअर अँड मार्शल आर्टस गेम्स, किकबॉक्सिंग, कराटे, बेल्ट रेसलिंग, मास रेसलिंग, केम्पो, पँक्रेशन या विविध क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवून गोल्ड, सिल्वर ब्रांन्स पदकाची आपल्या देशाकरता कमाई केलेली आहे या कामगिरीबद्दल त्याचे कौतुक करून शाबासकी देण्याकरिता पंतप्रधान यांनी आपला अमूल्य वेळ दिला होता.
याप्रसंगी जयदेव म्हमाने यांच्यासोबत त्यांचे गुरुवर्य ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक सी. ए. तांबोळी अध्यक्ष- नॅशनल किकबॉक्सिंग फेडरेशन, वाको इंडिया व बापूसाहेब घुले, सचिव- महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशन, प्रमोद चिंचवाडे रेफ्री पिंपरी चिंचवड उपस्थित होते.
देशाकरिता नवीन पिढीला जबाबदारी घेण्याची सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली या कामाकरिता सर्वतोपरी पीएमओच्या कार्यालयातून मदत करण्याचे आश्वासन दिले आणि पुढील कार्याकरिता शुभेच्छा दिले. खेळाच्या प्रगती करता व खेळाडू घडविण्याकरता ट्रेनिंग सेंटर उभे करण्यासंदर्भात मदत करण्याचे कबूल केले. असे प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
0 Comments