बुद्ध विहार म्हणजे मन शुद्ध करण्याचे ठिकाण इंदिरा नगर येथे बुद्ध विहार अभियानात भंते पय्यानंद थेरो यांचा उपदेश
लातूर: विहार म्हणजे सहवासात राहणे, आपल्या दुःखाचे हरण करण्यासाठी विहार असते. विहार हे समाजाच्या बहूउद्देशासाठी तयार केलेले असते, केवळ एखाद्या विशिष्ट कारणासाठी नसून प्रत्येकाच्या मनात धम्म संस्कार रुजवण्यासाठी व तसेच आपले मन शुद्ध करण्यासाठी बुद्ध विहारात सातत्याने येणे गरजेचे आहे. असा उपदेश भंते पय्यानंद थेरो यांनी आज १२ फेबु्रवारी रोजी इंदिरानगर येथील महाबोधी विहारात केला.
दर रविवारी प्रत्येक बुद्ध विहारात बुद्ध वंदना अभियानाच्या दुसर्या टप्प्यात लातूर शहरातील महाबोधी विहार, इंदिरा नगर येथे बुद्ध वंदनेचा तसेच धम्मदेसनाचा कार्यक्रम पार पडला.
तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात ही महापुरुषांच्या व माता रमाईच्या प्रतिमेला पुष्प वाहून झाली, नंतर क्षमा याचना, त्रीसरण पंचशील, त्रिरत्न वंदना, धम्मपालन गाथा झाली,तसेच २२ प्रतिज्ञाचे व संविधान प्रस्ताविकीचे सामूहिक वाचन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार, संपादक स्मृतिशेष बबन कांबळे यांना विहाराच्यावतीने व अभियानाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. अरुण कांबळे व वसंतराव वाघमारे यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रुपेश गायकवाड यांनी केले तर सूत्र संचालन हे मिलिंद धावारे यांनी केले.
0 Comments