औसा आमदार मतदार संघात दक्ष,पण ग्राम रोजगार सेवकांच्या मागणीकडे दुर्लक्ष
औशांत ग्रामरोजगार सेवक एक दिवसीय धरणे आंदोलन करणार!
बी डी उबाळे
औसा: रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक महत्त्वाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी स्थानिक पातळीवरील मजुरांचे "साहेब" ग्राम रोजगार सेवक महत्त्वाची भुमिका बजावतात. ग्रामपंचायत स्तरावर ग्राम रोजगार सेवकांचे काम हे अत्यंत महत्त्वाचे असून ग्रामरोजगार सेवकांच्या प्रश्नांसंबंधी वेळोवेळी मागण्या करूनही ग्रामरोजगार सेवकांचे प्रश्न प्रलंबित आहेत.औशांच्या रोजगार सेवकांची तर खुपचं वाईट अवस्था झाली आहे कारण औसा तालुक्याचे आमदार अभिमान्यू पवार यांना औसा तालुक्यात एका वर्षात हजारो किमी काम पूर्ण करण्यात आल्याने आज शेतरस्यांचे जनक म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात ओळखले जात आहे.संपुर्ण महाराष्ट्रात गोठे,सिंचन विहिरी, शेत रस्ते साठी औसा पॅटर्न ची चर्चा सुरू आहे.आ.पवार यांना शेतरस्तांचे जनक म्हणून ओळख देण्यात सिंहांचा वाटा हा ग्राम रोजगार सेवकांचा असूनही आजपर्यंत ग्रामरोजगार सेवक यांच्या समस्येकडे कोणीतरी आमदाराचे कान फुकण्याचा प्रकार घडला आहे काय?ज्यामुळे आमदार अभिमान्यू पवार यांनी आतापर्यंत याच्या समस्येकडे लक्ष दिले नसल्याने आज ग्राम रोजगार सेवक यांच्यावर आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्याची वेळ महाराष्ट्राला रोहयो तून दिशा देणारा हा तालुका आहे. याच्यावर ही आली आहे.
औशांतील ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या माध्यमातून आमदार पवार यांना वेळोवेळी निवेदने देऊनही कसल्याही प्रकारची मागणी आमदार यांनी शासन दरबारी मांडली नाही अशी चर्चा आहे. त्यामुळेच औसा तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक पंचायत समिती येथे आपल्या न्याय हक्काच्या आणि अन्न,वस्त्र,आणि निवारा या मानवाच्या प्रमुख गरजा तरी किमान भागल्या जाव्यात असे मानधन द्यावे या मागण्यांसाठी गुरुवार दि 9 फेब्रुवारी2023 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करत असून त्यांच्या मागण्याची आंदोलन केल्यानंतर तरी कोणी आमदार,खासदार,मंत्री, माजी, आजी दखल घेईल का?असी आपेक्षा ग्रामरोजगार सेवक यांना वाटत असून त्यांच्या मागण्या मध्ये ग्रामरोजगार सेवक हे पद पुर्णवेळ करत फिक्स मानधन देण्यात यावे, मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रवासभत्ता,सादील, अल्पोपहार भत्ता देण्यात यावी,15मार्च ते 31 मार्च 2021महिन्यातील मानधन आजपर्यंत मिळाले नाही ते तात्काळ देण्यात यावे.NMMS हजेरी साठी मोबाईल फोन व त्यासाठी लागणारे रिचार्ज देण्यात यावे. यासह अनेक प्रलंबीत मागण्या पूर्ण करण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन पंचायत समिती औसा येथे करत असून त्यांच्या संबंधी निवेदन गटविकास अधिकारी, तहसीलदार,व पोलिस स्टेशन औसा तसेच शेतरस्त्यांचे जनक औसा आ. पवार यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.


0 Comments