Latest News

6/recent/ticker-posts

खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सना "फिट फॉर ट्रॅव्हल" प्रमाणपत्रांचे लातूरात वितरण

खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सना "फिट फॉर ट्रॅव्हल" प्रमाणपत्रांचे लातूरात वितरण

राज्य परिवहन विभागाच्या उपक्रमास लातूर शहरातून प्रारंभ

लातूर: राज्य परिवहन विभागाच्या वतीने खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना "फिट फॉर ट्रॅव्हल" हे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले असून त्या अनुषंगाने लातूर शहरातील ट्रॅव्हल्सना हे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे.

राज्य परिवहन आयुक्त यांच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांच्या मार्गदर्शनाखाली काल सायंकाळी लातूर शहरातील ५ खाजगी प्रवासी वाहनांना या प्रमाणपत्राचे स्टिकर दर्शनी भागात लावून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या प्रमाणपत्रावर वाहन तपशील, परवाना, चालक, पोलिस हेल्पलाईन, महिलांसाठी हेल्पलाईन तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचे दूरध्वनी दर्शविणारे प्रमाणपत्र प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांवर दंडात्मक तसेच परवाना निलंबन अशी कारवाई करण्यात येणार आहे.

प्रवाशांनी "फिट फॉर ट्रॅव्हल" हे प्रमाणपत्र असणाऱ्या वाहनातूनच प्रवास करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन यावेळी प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक मनोज लोणारी यांनी केले आहे. लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने या उपक्रमास सहकार्य केले जाईल असे आश्वासन असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments