हैदराबाद येथे झालेल्या तिसऱ्या राष्ट्रीय खुल्या कराटे स्पर्धेत लातूरचा संघ चमकला
लातूर: एल.बी. इंडोर स्टेडियम, हैदराबाद तेथे नुकताच झालेल्या CM KCR मेघा कप- 2023 मध्ये तिसऱ्या राष्ट्रीय खुल्या कराटे स्पर्धेत लातूरचा संघ चमकला. वर्ल्ड जपानीझ शोटोकन कराटे ऑर्गनायझेशनच्या कराटेपटूने यश संपादन केले.
वयोगट 14 प्रगती जाधव काता प्रकार मध्ये कास्यपदक, कु्मिते मध्ये रजत पदक, आयान बागवान काता प्रकार मध्ये सुवर्णपदक, कु्मिते मध्ये कास्यपदक पटकावले. यशस्वी खेळाडूंना शिहान आजमीर शेख यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. पदक विजेते खेळाडूंचे विशद कांबळे, मुबशीर सय्यद, रेहान शेख, मुजहीद सय्यद, आरती कस्तुरे, रेशमा सर्वशी, हर्ष भोसले सह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


0 Comments