Latest News

6/recent/ticker-posts

शिवजयंती महोत्सवानिमित्त शिरोळ येथे पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

शिवजयंती महोत्सवानिमित्त शिरोळ येथे पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

शिरोळ: येथे होणाऱ्या शिवजयंती महोत्सवानिमीत्त आज मौजे शिरोळ येथे शिरुर अनंतपाळ पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता कमिटीची बैठक पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. शिरोळ ग्रामस्थ,ग्रामपंचायत,जिजाऊ प्रतिष्ठाण आणी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्यावतीने नूतन पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांचा सत्कार करण्यात आला. शिरोळ येथे दरवर्षी होणारा शिवजन्मोत्सव हा एक आदर्श महोत्सव असतो. संपुर्ण जिल्ह्यात शिरोळची शिवजयंती ही आदर्श शिवजयंती आहे असं मत राठोड साहेबांनी व्यक्त केले.

यावर्षी ही असंच अनोखं उदाहरण शिरोळवासियांतर्फे ठेवलं जाईल याची ग्वाही जयंतीचे समन्वयक प्रसाद जाधव यांनी दिली. यावेळी व्यासपिठावर सरपंच गौतम सुरवसे, उपसरपंच प्रताप पाटील, पोलीस पाटील बालाजी धडे हे होते. कार्यक्रमास गावकऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सुत्रसंचालन सिध्देश्वर कांबळे यांनी केले आणी आभार प्रदर्शन मारोती जाधव यांनी केलं.

Post a Comment

0 Comments