Latest News

6/recent/ticker-posts

आधार प्रतिष्ठानच्या महाआरोग्य सर्व रोग निदान शिबिरास मोठा प्रतिसाद

आधार प्रतिष्ठानच्या महाआरोग्य सर्व रोग निदान शिबिरास मोठा प्रतिसाद


बी डी उबाळे 

औसा: तालुक्यातील भादा येथे आधार प्रतिष्ठान कडून सर्व रोग निदान महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये लातूर जिल्ह्यातील नामांकित डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते. महात्मा बसवेश्वर जयंती,रमजान ईद,अक्षय तृतीया,परशुराम महाराज निमित्त शनिवार दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 09:00 ते 01:00 पर्यंत ग्राम पंचायत आणि शेजारी भादा येथे एकूण 9 स्पेशालिस्ट डॉ च्या उपस्थितीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन औसा तालुका पुरवठा अधिकारी तथा नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या शिबिरामध्ये औसा तालुक्यातील आणि भादा परिसरातील बोरगांव, काळमाथा, वडजी, अंदोरा,बऱ्हाणपूर आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला व मिळणाऱ्या आरोग्य सेवेचा लाभ घेतला.

या शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हनुमंत किनीकर न्यूरोसर्जन, डॉ. श्यामसुंदर पाटील, फिजिशियन, हृदयरोग, मधुमेह तज्ञ, लातूर आणि प्रमुख उपस्थिती डॉ. रोहन राम हुडगे, नवजात शिशू. व बालरोग तज्ज्ञ लातूर, डॉ. प्रमोद लोकरे, मूळव्याध, फिशर, लेप्रोस्कोपी सर्जन, लातूर, डॉ. आशा राहुल  हाबरे, स्त्री रोग तज्ञ, औसा, डॉ. श्रीप्रसाद आलूरे, दंत चिकित्सक, डेंटिस्ट लातूर, डॉ. स्वाती शेळके-पाटील, थॉयराईड अँड ओबिसिटी तज्ञ, लातूर, डॉ. हेमंत केंद्रे, त्वचा रोग तज्ञ, लातूर,आणि उदयगिरी लॉन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय लातूर यांच्याकडून मोफत नेत्र रोग तपासणी व मापक दरात शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेले होते. यामुळे बारा रुग्ण आपल्या डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी उदगीरला रवाना झाले आहेत हा महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी आधार प्रतिष्ठानचे आधार स्तंभ आर आर पाटील, मनोज पाटील, बालाजी दे उबाळे, प्रशांत पाटील, दिपक मांनधने, मनोज उबाळे, रियाज खोजे, पांडुरंग बनसोडे, लखन लटूरे, सुनील राऊत आणि भादेकर मित्र परिवार यांनी सहकार्य केले आणि हा कार्यक्रम यशस्वी केला.

Post a Comment

0 Comments