Latest News

6/recent/ticker-posts

प्रा.मनोज गवरे लिखीत पुस्तक प्रकाशन सोहळा

प्रा.मनोज गवरे लिखीत पुस्तक प्रकाशन सोहळा


लातूर: दयानंद कला कनिष्ठ महाविद्यालयातील  प्रा.मनोज गवरे लिखित सहा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार दि. २० एप्रिल २०२३ रोजी डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना) महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निकिता पब्लिकेशन निर्मित महाराष्ट्र पोलीस मेगा भरती मार्गदर्शिका व प्रश्नसंच, संपुर्ण ग्रामसेवक सरळसेवा भरती मार्गदर्शिका, तलाठी व मंडळ अधिकारी परीक्षा संच,TCS पॅटर्न परिपुर्ण मार्गदर्शिका, MAHA TAIT प्रश्न संच, महाराष्ट्र वनविभाग भरती परीक्षा मार्गदर्शिक अशा सहा पुस्तकाचे विमोचन दयानंद शिक्षण संस्था येथे डॉ.महेश पालकर(शिक्षण संचालक ,अध्यक्ष राज्य परीक्षा परिषद,महाराष्ट्र राज्य), डॉ. गणपतराव मोरे (शिक्षण उपसंचालक लातूर विभाग), राजेश क्षीरसागर (उपसंचालक योजना विभाग) संजय कुमार राठोड (उपायुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे), सुधाकर  तेलंग(विभागीय अध्यक्ष लातूर विभागीय मंडळ) यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी दत्तात्रय मठपती,  सहाय्यक शिक्षण उपसंचालक लातूर, नागेश मापारी, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक ,श्रीमती वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड , उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे , संगीत विभाग प्रमुख संदिपान जगदाळे, प्रा. संतोष शेळगे,प्रा. विलास कोमटवाड प्रा. महेश जंगापल्ले, प्रदीप डाहुले, कालिदास सूर्यवंशी, कैलास क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सदीपांन जगदाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.विलास कोमटवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.जिगाजी बुद्रूके, प्रा.रत्नाकर केंद्रे, श्रीकांत जोशी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments