सेवानिवृत्त मुख्याध्यापक हाफेज अ.लतीफ जागीरदार व सहशिक्षक शेख अय्युब रहेमान यांचा सत्कार
अहेमदपूर : काळेगाव येथील सुलेमानिया उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हाफेज अ.लतीफ जागीरदार व सहशिक्षक शेख अय्युब रहेमान प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्या बदल सत्कार करणीयत आला. ३५ वर्षाची प्रदीर्घ सेवा केल्यानंतर त्यांना मंगळवारी दिनांक 13 फेब्रुवारी 2024 शाळेच्या वतीने निरोप देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव होते, प्रमुख उपस्थिती माजी मंत्री विनायकराव पाटील, संस्थेचे सचिव मुजीब पटेल जागीरदार यांची होती तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था अध्यक्ष नजीब जागीरदार, मोहिब कादरी साहेब, विशंभर पाटील, जहीरमिया देशमुख, सरपंच सय्यद खिझर जागीरदार, मा.सरपंच शुकूर जागीरदार, मुख्याधापक नशीबोद्दीन जागीरदार, मोहसीन बायजिद, मुख्याधपाक मजीद जागीरदार, सय्यद गाजी, मा.नगरसेवक डॉ. फुजेल जागीरदार हे होते. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थ्यांसह पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
एस.ए.जागीरदार हायस्कूल अँड ज्यू.कॉलेज व सुलेमानिया उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने मुख्याध्यापक हाफेज अ.लतीफ जागीरदार व सहशिक्षक शेख अय्युब रहेमान यांचा यथोचित अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते भरपेहराव आहेर करून व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मंचावरील मान्यवरासह विद्यार्थी शिक्षकाकडून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील विध्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तत्पर राहून उत्तम मार्गदर्शक बनून सेवा करणारे मुख्याधपाक, सहशिक्षक हे आज सेवानिवृत्त होत आहेत आशा भावना व्यक्त करून सरांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमला यशस्वी करणीयासाठी माध्यमिक चे मुख्याध्यापक अबुबकर हबीब प्राथमिक चे मुख्याध्यापक मुफ्ती खलिक अस्लम सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन काझी रियाज, जब्बार शेख यांनी केले तर आभार खतिब यांनी मानले.
0 Comments