Latest News

6/recent/ticker-posts

अशिहारा कराटे इंटरनॅशनल आयोजित मुलुंड मॅरेथॉन स्पर्धा- 2024 चे बक्षीस वितरण

अशिहारा कराटे इंटरनॅशनल आयोजित मुलुंड मॅरेथॉन स्पर्धा- 2024 चे बक्षीस वितरण

मुंबई : अशिहरा कराटे इंटरनॅशनल चे मुंबई प्रमुख प्रशिक्षक दयाशंकर पाल आयोजित मुलुंड मॅरेथॉन स्पर्धा - 2024 चे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही आयोजन करण्यात आले होते. गेल्या चार वर्षापासून ही स्पर्धा घेतली जाते. यंदा झालेल्या स्पर्धेची सुरुवात मुलुंड येथील लाइन्स क्लब ऑफ मुलुंड च्या मैदानात सुरुवात करण्यात आली. या स्पर्धा दोन गटामध्ये घेण्यात आली. मुली व मुले 3 कि.मी. बारा वय वर्ष पुढील धावपटू तर महिला व पुरुष 5 कि.मी. धावण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाज सेवक डॉ.बाबुलाल सिंह, डॉ.आर.आर.सिंह, डॉ.सचिन सिंह, डॉ.आर.एम.पाल यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात केली.

3 कि.मी. वयोगटामध्ये मुलीमध्ये कशिश जाधव (प्रथम), आलिया शरीफ खान (द्वितीय), स्वरा केलकर (तृतीय), तर मुलांमध्ये पार्थं संघवी (प्रथम), आर्यन जैसवाल (द्वितीय), लक्ष्मण भूल (तृतीय) अनुक्रमे चषक पटकावला 5 कि.मी. वयोगटामध्ये महिला मध्ये कु.दिशा पाल (प्रथम), रोशनी इंगले (द्वितीय), आर्या अवध (तृतीय) तर पुरुषामध्ये उत्कर्ष पाल(प्रथम), परम शाह(द्वितीय), शिवकुमार (तृतीय) अनुक्रमे चषक पटकावला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून के.वाय.पटवेकर ( संपादक- मराठी अस्मितेचा इशारा,लातुर ), बिपीन पांचाल (संपादक हमारा मुलुंड), विशाल कोथिमिरे( नवी मुंबई ), मारुती चालके ( मलकापुर,सातारा ), मुलुंड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश बने, गोकुल ढेरे, भागवत जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार यादव (महापौर पदक प्राप्त शिक्षक), मोहन लाल राज, अश्विनी पोचे, राजन उटवाल, महेश पाटील, मैथ्यु चेरियन उपस्थित होते. वरील मान्यवरांच्या हस्ते यशस्वी धावपटूंना पदक, प्रमाणपत्र व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्वच धावपटूंना प्रमाणपत्र व पदक देण्यात आले. कार्यक्रम स्थळी प्लैटिनम हॉस्पिटल, मुलुंड चे डॉ. सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पूर्ण टीम एम्बुलेंस सह उपस्थित होती. सोनम केवट, राकेश दूबे, संजय मिश्रा, रमाशंकर पाल, विजयपाल, दिनेश सिंह, ऋषिकेश पराड़कर, तनमय येरम, नैना पाटिल, अजीत यादव, अभिषेक गुप्ता, राजेश प्रजापति, आशीष पाल, दक्ष पाल, पूजालता गुप्ता, कश्यपी चंदे, सोनम केवट, सौरभ गुप्ता, तृप्ति पतींगे, सुदेश जाधव यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नैना पाटिल, सोनम केवट, कश्यपी चंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशिक्षक दया पाल यांनी मानले.



 

Post a Comment

0 Comments