मोहोळ येथे अशिहारा कराटेच्या येलो बेल्ट धारकांना प्रमाणपत्र व बेल्ट वितरण
प्रमाणपत्र आणि बेल्ट स्वीकारताना यशस्वी कराटेपटू, परीक्षक आणि पालकांसमवेत सामूहिक छायाचित्र.
सोलापूर : मोहोळ येथील शिक्षणमित्र डी. व्ही. गायकवाड प्राथमिक शाळेत अशिहारा कराटे असोसिएशन, लातूरच्या वतीने येलो बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत उत्तीर्णता मिळवली. या परीक्षेत स्वरांजली काकडे, तन्वी गुरव, कबीर आदलिंगे यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत पदके पटकावली. तसेच उत्कर्षा कारंडे, संचिता महामुनी, जानवी गुरव, वैष्णवी फसके, उत्कर्षा अंडगे, प्रांजली गावडे, अपूर्वा गावडे, तेजस्विनी सुतार, समर्थ काकडे, सर्वेश पुराणिक या कराटे प्रशिक्षणार्थींनी यश संपादन करून येलो बेल्ट परीक्षेत यश मिळवलेउत्तीर्ण झालेल्या सर्व कराटेपटूंना अशिहारा कराटे इंडियाच्या अधिकृत प्रमाणपत्रांसह बेल्ट प्रदान करण्यात आले. मुख्य परीक्षक म्हणून के. वाय. पटवेकर यांनी परीक्षकाची भूमिका बजावली, तर महिला कराटे प्रशिक्षिका सौ. सुजाता (माळी) आदलिंगे यांनी सह परीक्षक म्हणून योगदान दिले.
प्रमाणपत्र व बेल्ट वितरण समारंभास अध्यक्ष म्हणून दिनेश आदलिंगे उपस्थित होते. या वेळी राजकुमार कारंडे, अगंम जोशी, सोमअण्णा गुरव, सौ. अनुजा सुतार, सौ. जनाबाई गावडे, सौ. रोहिनी होनमाने यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून सर्व यशस्वी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मुख्य कराटे प्रशिक्षिका सौ. सुजाता (माळी) आदलिंगे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला.
0 Comments