Latest News

6/recent/ticker-posts

युवा उद्योजक जुगलकिशोर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत उत्साहात साजरा

युवा उद्योजक जुगलकिशोर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत उत्साहात साजरा

लातूर : कसलाही डामडौल न करता अनावश्यक खर्च टाळत येथील युवा उद्योजक तथा माझं लातूर परिवाराचे सक्रीय सदस्य डॉ जुगलकिशोर तोष्णीवाल यांनी आपला वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत सहकुटुंब उत्साहात साजरा केला.

माझं लातूर परिवाराच्या माध्यमातून लातूरच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे युवा उद्योजक डॉ.जुगलकिशोर तोष्णीवाल यांनी आपला वाढदिवस वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत साजरा करणार असल्याचा मानस व्यक्त केला होता यास माझं लातूर परिवाराने साथ देत लातूर जिल्हा युवा मोटार मालक संघटनेच्या पुढाकारातून येथील मातोश्री वृद्धाश्रमात साजरा केला. याप्रसंगी तोष्णीवाल कुटुंबातील सदस्य, माझं लातूर परिवाराचे सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी आश्रमातील आजींच्या हस्ते जुगलकिशोर यांचे औक्षण करण्यात आले. केक कापून सर्वांनी शुभेच्छा दिल्या तर उपस्थित सर्व निवासी आजी आजोबांना भेटवस्तू देऊन जुगलकिशोर यांनी आपला वाढदिवस सामाजिक जाणिवेतून वेगळ्या पद्धतीने साजरा केला. तोष्णीवाल कुटुंबातील सर्व सदस्यांचे वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रमातच साजरे होतील असे आश्वासन याप्रसंगी दिले. सामाजिक बांधिलकी जपत, अनावश्यक खर्च टाळत वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या जीवनात आनंदाचे क्षण पेरणारा हा वाढदिवस समाजासाठी दिशादर्शक आणि अनुकरणीय असाच ठरला.

Post a Comment

0 Comments