Latest News

6/recent/ticker-posts

शिष्यवृत्ती परीक्षेत देवराज तुकाराम तलवाडे शाळेतून प्रथम

शिष्यवृत्ती परीक्षेत देवराज तुकाराम तलवाडे शाळेतून प्रथम

देवणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुरनाळ (ता. देवणी) येथील विद्यार्थ्यांनी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पात्र विद्यार्थी व त्यांचे गुण पुढीलप्रमाणे आहेत :  देवराज तुकाराम तलवाडे - 252/300, निखत हबीबसाब सय्यद - 250/300, विराट साधू बर्गे — 248/300, वैष्णवी दत्तात्रय बिरादार - 228/300, भागवत संजय घोरवडे - 224/300, आयशा हुसैन शेख - 218/300, अनिकेत बब्रुवान गायकवाड - 202/300, कार्तीक दिपक सुर्यवंशी - 200/300, बिलाल बडेसाब पठाण - 200/300, मिनाक्षी नवनाथ सुर्यवंशी - 198/300, संस्कार बबनराव माने - 172/300, जोया मोईन शेख - 148/300 विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मल्लिकार्जुन मानकरी, महादेव मळभागे, दादू मिर्झा तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments