Latest News

6/recent/ticker-posts

नळेगाव येथे अल फारुख उर्दू शाळेच्या शिक्षकांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न

नळेगाव येथे अल फारुख उर्दू शाळेच्या शिक्षकांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न


नळेगाव : (ता. चाकूर) येथील अल फारुख उर्दू प्राथमिक शाळेचे जेष्ठ शिक्षक शेख कासीम चाँदसाब आणि सौ. सय्यद नजमा बेगम अ. हमीदसाब हे दीर्घ सेवेनंतर ३० एप्रिल २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने शाळेच्यावतीने २६ एप्रिल २०२५ रोजी त्यांच्या सन्मानार्थ निरोप व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नजीब जागीरदार होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुखीम देशमुख यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इर्शाद पिरजादे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक वहाब जागीरदार यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक कादिर जागीरदार यांनी केले.

या वेळी समद शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना शेख कासीम यांनी आपल्या ३५ वर्षांच्या सेवाभिमानाचा उल्लेख करत शाळा, संस्था व विद्यार्थ्यांचे आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष नजीब जागीरदार यांनी शेख कासीम व सय्यद नजमा बेगम यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात शेख मुजीब, हाश्मी मोईनोद्दीन, सय्यद इस्माईल, लायक सोदागर, इल्यास शेख, मुंजेवार बाबू, हुसेन घोरवाडे, खुरेशी साहेबलाल, शेख युनूस, नुरोद्दीन तांबोळी, सय्यद फय्याज, उस्मान इनामदार, जमील पटेल, महेबूब शेख, रफीख मणियार आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments