नळेगावात शिवजयंतीनिमित्त २४३ जणांचे विक्रमी रक्तदान;अनिल चव्हाण यांचे ६१ वे रक्तदान
नळेगाव : नळेगाव येथे शिवजयंती निमित्त अनिल चव्हाण मित्र मंडळ व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २५ वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरात विक्रमी २४३ जणांनी रक्तदान करून शिवजयंती साजरी केली.
शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, सरपंच सूर्यकांत चव्हाण, उपसरपंच पदमिन खांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव बुदरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव पाटील, वि.का.सो.चेअरमन शेषेराव मुंजाने माजी चेअरमन दयानंद मानखेडे, माजी सरपंच अनंत कांबळे, माजी उपसरपंच पांडुरंग रेड्डी, घृष्णेश्वर मलशेट्टे, माजी पंचायत समिती सदस्य अनिल चव्हाण, उमाकांत सावंत, दगडु सावळकर, सतीश पांडे, कावेरी गाडेकर, अश्फाक मुजावर, शमीम कोतवाल, राम किशन शिरुरे, डॉ.बालाजी पांचाळ, तलाठी प्रशांत तेरकर, व्यंकटी फरकांडे, अमजद घोरवाडे, खुदबोद्दीन घोरवडे, मुक्तार मुजावर, राजेंद्र सावंत, बालाजी सावंत, बालाजी शेलार, भिवाजी गव्हाणे, सुनील चव्हाण, विश्वनाथ सोनटक्के, गजानन बिराजदार, गणेश शिंदाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचा प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात जोखीम विमा पॉलिसी काढण्यात आले.
हे शिबिर यशस्वीतेसाठी सत्यवान सावंत, कैलास चव्हाण, मारोती भालेकर, संतोष तेलंगे, अनिल पांचाळ, संतोष बिराजदार, पप्पू पांडे, महेश इरलेवाड, अमोल सोमवंशी, अमीर खुरेशी, विजय ढोबळे पाटील, वेकंट माचवे, नवनाथ मानखेडे, अमोल पांचाळ, कृष्णा पांचाळ, दीपक जाधव, आदित्य तेलंगे, किरण हुडगे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन प्रल्हाद माचवे, प्रमोद हुडगे यांनी केले तर आभार अनिल चव्हाण यांनी मानले.
0 Comments