गांधी संस्कार परीक्षेत शिवनेरीला दोन सुवर्ण पदक
शिरूर आनंतपाळ : येथील शिवनेरी महाविद्यालयामध्ये गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेत शिवनेरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लातूर जिल्ह्यातून प्रथम व द्वितीय क्रमांक मिळून दोन सुवर्णपदक व एक रौप्यपदक पटकावले आहे. यामध्ये बीएससी द्वितीय वर्षातील विद्यार्थी कु.सोनवणे काजल निळकंठ आणि बीकॉम प्रथम वर्षातील विद्यार्थिनी कु.वैष्णवी सुखानंद बिरादार प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळविले. मुल्ला सालिया रब्बानी बीकॉम द्वितीय वर्ष रौप्यपदक प्राप्त केले. महाविद्यालयात दरवर्षी गांधीजींच्या विचारांचा प्रसार व प्रचार होण्यासाठी त्यांना गांधीजींच्या जीवनावर पुस्तके देऊन त्यांचा अभ्यास करून त्यावर त्यांची परीक्षा घेतली जाते.

या परीक्षेसाठी महाविद्यालयाचे एकूण 56 विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी वरील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य ए. बी.धालगडे सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या परीक्षेचे महाविद्यालयात आयोजित आणि मार्गदर्शन गांधी विचार संस्कार परीक्षा समन्वयक प्रा. सतीश माने, प्रा. श्याम कांबळे आणि डॉ.सतीश कुंडलवार यांनी केले.या प्रसंगी IQAC चे समन्वयक डॉ अभय बोंडगे, डॉ. अमोल लाटे, डॉ. सतीश कुंडलवार, डॉ.हनुमंत वागलगावे,प्रा संदीप वडनेरे आणि प्रा. शेख शौकतअली व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments