Latest News

6/recent/ticker-posts

अल फारुख ऊर्दू विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

अल फारुख ऊर्दू विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

नळेगाव : येथील अल फारुख उर्दू विद्यालयात शनिवारी (दि. २४) दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक कादीर जागीरदार तर प्रमुख पाहणे म्हणून शकील सय्यद,ए.आर जागीरदार उर्दू प्राथमिक शाळा, वडवळचे मुख्याध्यापक सय्यद जुबेर, मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळा, शिरूर अंनतपाळचे मुख्याध्यापिका यास्मिन मॅडम, सादीक मुजावर आदी उपस्थित होते. १० वी मधील विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. प्रशालातील शिक्षक मुजीब शेख, जुबेर सय्यद, इरशाद पिरजादे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

प्रमुख मार्गदर्शक मुख्याधपाक कादीर जागीरदार यांनी आपले विचार मांडताना विविध विषयास स्पर्श या वयात चुकीच्या मित्राची संगत करू नका, नम्रता सोडू नका, उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन परिश्रम करा प्रयत्नात सातत्य राहू द्या, परीक्षा म्हणून जीवन नाही जीवन हीच एक परीक्षा आहे. काळात दडपण येऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याबाबत संवाद साधला. अपयश आलेच तर खचून जाऊ नका आदींबाबत आपल्या भाषणात सविस्तर मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व भविष्यासाठी शुभेच्छा दिले. या वेळी ९ वीच्या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन व आभार वहाब जागीरदार यांनी मानले यावेळी पालक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments