डॉ. संतुजी लाड सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२४ कार्यकारिणी जाहीर
लातूर : सत्यशोधक समाजाचे अग्रदुत महात्मा जोतिबा फुले यांचे सहकारी शिष्य,हिंदु खाटीक समाज भूषण डॉ. संतुजी रामजी लाड यांच्या १८३ व्या जयंती निमित्त अँड. प्रदिपसिंह गंगणे यांच्या अध्यक्षते खाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
सर्वानुमते डॉ. संतुजी लाड सार्वजनिक जयंती उत्सव समिती, लातूर अध्यक्ष पदी आकाश भिमाशंकर डोंगरे, उपाध्यक्ष अँड सुनिल फावडे, स्वागताध्यक्षपदी दिगंबर कांबळे, कोषाध्यक्ष आनंद पारसेवार तर कार्यकारिणी सदस्य पदी श्रीनिवास हांडे पाटील, शाम डोंगरे, रोहित थोरात, राजु बुये, प्रविण नरवडे, रोहीत रूमने, देवेंद्र जोशी आदींची निवड करण्यात आली आहे या बैठकीस कैलाश डोंगरे, ताहेरभाई सौदागर, गोवर्धन गंगणे, बालाजी पिंपळे, किरण कांबळे, अँड सुहास बेंद्रे, दिपक गंगणे, जम्मालोद्दीन मणियार, भीम दूनगावे, राजु बूये, श्रीनिवास रांजणकर, केदार कोथिंबीरे, राजेश रूमने,रामभाऊ जवळगेकर, रविकुमार वंजारे आदीची उपस्थिती होती. अभिवादन कार्यक्रम ४ मार्च रोजी सकाळी ९.३० वा गांधी मैदान लातूर येथील नियोजित डॉ. संतुजी लाड पुतळा परिसरात होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
0 Comments