Latest News

6/recent/ticker-posts

मतदार जनजागृती अभियानात जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनचा उस्फुर्त सहभाग; मतदानासाठी येणाऱ्या प्रवाशांना प्रवास भाड्यात १० टक्के सूट

मतदार जनजागृती अभियानात जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनचा उस्फुर्त सहभाग; मतदानासाठी येणाऱ्या प्रवाशांना प्रवास भाड्यात १० टक्के सूट


प्रत्येक खासगी प्रवासी वाहतूक बसमध्ये मतदान जागृती फलक लावणार

सतीश तांदळे

लातूर : जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्व संस्था, संघटना आणि आस्थापनानी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले आहे या आवाहनाला प्रतिसाद देत लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना प्रवासी भाड्यात १० टक्के सूट देण्यात आली आहे तर लातूरच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने मतदान जागृती करणारे फलक सर्व खासगी प्रवासी वाहनात दर्शनी भागात लावण्यात येत आहेत.

निवडणूक हा लोकशाहीचा सर्वोच्च उत्सव असून या उत्सवात समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे. मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाही बळकट करावी असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले आहे. गेल्या लोकसभेत ६२ टक्के मतदान झाले होते मात्र यावेळी मतदानाची टक्केवारी वाढवून एक नवा लातूर पॅटर्न निर्माण व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अशी साद घातली आहे.

या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने मतदान करण्यास येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांना प्रवास भाड्यात १० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक ५, ६ मे २०२४ तारखेला मतदान करण्यास लातूर जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना आणि दिनांक ७, ८ मे २०२४ या दिवशी मतदान करून जाणाऱ्या प्रवाशांना ही सूट लागू असेल. प्रवाशांनी आपले आधार कार्ड किंवा मतदान कार्ड सोबत ठेवावे. तर मतदान करून जाणाऱ्या प्रवाशांनी मतदान केल्याची बोटावरील शाई दाखवणे बंधनकारक आहे. 

यसोबतच लातूर प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने मतदान जनजागृती फलक उपलब्ध करून देण्यात आले आहेत हे फलक लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने सर्व खासगी प्रवासी वाहनात दर्शनी ठिकाणी लाऊन या अभियानात सहभाग नोंदविला आहे. मुंबई, हैद्राबाद, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदाबाद या शहरात असणाऱ्या लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदार बंधू भगिनींनी या संधीचा लाभ घेऊन मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments