महाराष्ट्र विद्यालय मुदगड एकोजी येथे स्वशासन दिन उत्साहात साजरा
निलंगा : तालुक्यातील मुदगड एकोजी येथील महाराष्ट्र विद्यालय येथे दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिन उत्साहात साजरा केला. या विशेष दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षक व प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत नेतृत्व कौशल्याचे प्रदर्शन केले. स्वयंशासन दिनासाठी मुख्याध्यापकपदी कु. गायत्री कुमारे, उपमुख्याध्यापक म्हणून कु. स्नेहा बेदरे आणि माधव मनाळे, तर पर्यवेक्षक म्हणून कु. वैभवी हराळे व कु. सृष्टी मुळे यांनी जबाबदारी पार पाडली. या उपक्रमाला गावातील असंख्य पालकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे आणि शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले.
अनुभव कथन कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष पाचंगे आर. के. प्रमुख पाहुणे टेकाळे व्ही. बी. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पाठ निरीक्षक माने एम. व्ही., बोळे आर. व्ही., गिरी पी. ए. यांनी देखरेखीसाठी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी एस. एस., इंगळे बी. व्ही., लामतुरे आर. एस., कोळी व्ही. आर., साळुंके डी. एम., मुडे के. ए., राजे ए. एस. यांनी विशेष प्रयत्न केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शालेय प्रशासन, जबाबदारीची जाणीव आणि नेतृत्व गुण आत्मसात करण्याची संधी मिळाली. स्वयंशासन दिनाचे आयोजन यशस्वी झाल्याबद्दल शाळेच्या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
0 Comments