Latest News

6/recent/ticker-posts

निटूर : शिक्षक रवींद्र सूर्यवंशी यांना अश्रूंची श्रद्धांजली

निटूर : शिक्षक रवींद्र सूर्यवंशी यांना अश्रूंची श्रद्धांजली

अपघाती निधनाने निटूर व कलमुगळी गावात शोककळा; शाळेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन



निटूर :( प्रतिनिधी/युसुफ शेख )महाराष्ट्र विद्यालयातील शिक्षक रवींद्र नागप्पा सूर्यवंशी (रा. कलमुगळी) यांचे रविवारी रात्री कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. सोमवारी दुपारी त्यांच्या मूळगावी कलमुगळी येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सूर्यवंशी सर हे अत्यंत शांत, कर्तव्यनिष्ठ आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

मंगळवारी महाराष्ट्र विद्यालय निटूर येथे शाळेच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी दिवंगत सूर्यवंशी सरांना सामूहिकरित्या श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ, शिक्षक भोयबार, पत्रकार- राजकुमार सोनी, युसूफ शेख यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. नरसिंग पाटील, राजू सोमवंशी, अनिल देशमुख, मल्लिनाथ बुरकुले, सुशांत घाटके, नंदकुमार हसबे, लक्ष्मण मगर, सह शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेल्या सूर्यवंशी सरांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments