Latest News

6/recent/ticker-posts

गुणवत्तेला सलाम! लातूरमध्ये 100 हून अधिक मुस्लिम विद्यार्थ्यांचा ‘PATM’ तर्फे गौरव

गुणवत्तेला सलाम! लातूरमध्ये 100 हून अधिक मुस्लिम विद्यार्थ्यांचा ‘PATM’ तर्फे गौरव


लातूर : PATM - पटवेकर अत्तार तांबोळी मणियार फाउंडेशन च्या वतीने लातूर जिल्ह्यातील तसेच लातूर शहरातील मुस्लिम समाजातील इयत्ता दहावी शालांत परीक्षेमध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या आणि NEET परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा सोहळा शनिवार, दिनांक 28 जून रोजी सायंकाळी असर नमाजनंतर एम. के. फंक्शन हॉल, 60 फीट रोड, लातूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात दोन सत्रांमध्ये 100 हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मौलाना शौकत साब यांच्या कुराण पठणाने झाली. यानंतर खानसा कुमठे, जैद मणियार या गुणवंत विद्यार्थ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सनदी लेखाकार- मोहसीन शेख यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना आपल्या अनुभवांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवलेले सेवानिवृत्त सैन्य अधिकारी तथा ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक सी. ए. तांबोळी सर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांसोबत पालकांचेही विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच शारीरिक क्षमतेचे आणि मानसिक समतोलाचे मोठे महत्त्व आहे. हे संतुलन मिळवण्यासाठी खेळ हा उत्तम मार्ग आहे. खेळामुळे फक्त शरीर तंदुरुस्त राहत नाही, तर नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, सहकार्य, शिस्त आणि आत्मविश्वास यांसारखे गुणही विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतात.

या कार्यक्रमात समाजातील मान्यवरांचे स्वागतही करण्यात आले. हाजी अ. रहेमान मणियार, तबरेज तांबोळी, अहेमद मेहबूबसाब पटवेकर (नळेगाव), मो. कामील मणियार, सादीक अत्तार, लातूर, एम. मैनोद्दीन मणियार आदी मान्यवरांचा इस्लामिक दस्ती, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे सहसचिव शादाबभाई पटवेकर यांनी केले. सूत्रसंचालन सुप्रसिद्ध गालिब शेख आणि रशीद कासार यांनी तर आभार प्रदर्शन फाउंडेशनचे अध्यक्ष सरफराज (बाबा) मणियार यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सदर फाऊंडेशनचे सचिव- प्रा. फारूक तांबोळी, उपाध्यक्ष- पत्रकार के. वाय. पटवेकर, कोषाध्यक्ष- हबीब मणियार, संस्थापक सदस्य-  गफार सय्यद, अ‍ॅड. कलीम, जफरभाई पटवेकर, फैयाजभाई अत्तार सह अ‍ॅड. उबेद अ. रहेमान मणियार, आबिद मणियार, ख्वाजा मनियार आदिने परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments