Latest News

6/recent/ticker-posts

अमोल तांबे यांनी लातूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला; सोमय मुंडे यांचा निरोप समारंभ

अमोल तांबे यांनी लातूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला; सोमय मुंडे यांचा निरोप समारंभ

मावळते पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, नवनियुक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना.

ला
तूर : जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून अमोल तांबे यांनी आज, सोमवार दिनांक ३० जून रोजी दुपारी १:०० वाजता अधिकृतपणे पदभार स्वीकारला. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मावळते पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अमोल तांबे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
पुणे येथे बदली झालेल्या पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आपल्या निरोप समारंभात लातूर जिल्ह्यातील सेवा काळाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यात काम करताना लोकप्रतिनिधी, नागरिक आणि पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भरघोस सहकार्य लाभले. येथे काम करताना खूप चांगला अनुभव मिळाला आणि अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये नूतन अधीक्षकांचे स्वागत आणि मावळत्या अधीक्षकांचा निरोप समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक गजानन भातलवंडे, लातूर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना सोमय मुंडे यांनी सांगितले की, लातूरकरांच्या सहकार्यामुळे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवता आले. पोलीस दलातील सहकाऱ्यांच्या मदतीमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखता आली तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवता आले.

Post a Comment

0 Comments