Latest News

6/recent/ticker-posts

पत्रकाराला धमकी प्रकरणी पत्रकार संघटनांकडून निषेध; संरक्षणाची मागणी

पत्रकाराला धमकी प्रकरणी पत्रकार संघटनांकडून निषेध; संरक्षणाची मागणी


निलंगा : शिरोळ (वा.) ता. निलंगा येथील पुण्यनगरी दैनिकाचे पत्रकार सलीम महंमद पठाण यांनी गावात सुरू असलेल्या वाळू व गौण खनिज उपशाविषयी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर गावातील गणेश सुर्यभान जाधव यांनी कथितरीत्या त्यांच्याशी वाद घालून, भविष्यात अशा बातम्या न देण्यास सांगितले आणि विरोध दर्शविला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पत्रकार पठाण यांनी 29 जून 2025 रोजी शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संबंधित तक्रारीवर पोलिसांनी प्राथमिक स्वरूपाची नोंद घेतली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत निलंगा तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांना आवश्यक ते संरक्षण मिळावे, तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments