Latest News

6/recent/ticker-posts

डॉ अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सचिंद्र कांबळे यांची निवड

डॉ अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सचिंद्र कांबळे यांची निवड

लातूर : दि. 30 जून शहरातील डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सचिंद्र कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून ते सन 2025 या सालातील वर्षभर समाजाचे अध्यक्ष म्हणून सक्रिय राहणार आहेत तर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्याबरोबरच मातंग समाजातील अडीअडचणी सोडविण्यासह समाजाचा विकास साधण्यासाठी पुढाकार घेणार आहेत.

साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आज दिनांक 30 जून रोजी सकाळी 10:30 वाजता समाजातील युवक जेष्ठ विविध पक्षाचे नेते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार पोलीस बांधव यांच्या उपस्थितीत सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2025 च्या अध्यक्ष निवडीसाठी माजी अध्यक्ष राज क्षिरसागर यांनी बैठक आयोजित केली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते जी ए गायकवाड हे उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन Adv. किशोर शिंदे यांनी तर आभार राज क्षीरसागर यांनी मांडले.

यावेळी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादू भाऊ रसाळ, सुनील सौदागर, सुनील बसपुरे, कुचेकर, राहुल क्षीरसागर, आनंद वैरागे, बंटी गायकवाड, बापु मगर, अशोक देडे, पिराजी साठे, नुतन हणमंते, अश्विन कांबळे, लक्ष्मण कांबळे, उपाध्ये, रवी कदम यांच्यासह मोठ्या संख्येवर समाजबांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments