लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
लातूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त एमआयडीसी येथील मतिमंद विद्यालयाच्या सभागृहात जीवन विकास प्रतिष्ठान व सदासुख हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी गुरुवारी करण्यात आली.
या तपासणी शिबिराचे उदघाटन जीवन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयसिंहराव देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चेतन सारडा, डॉ.विक्रम सारडा, डॉ. ममता जोशी, डॉ.प्रगती पाटील, डॉ.सुजाता सारडा, डॉ.राखी सारडा, डॉ. समीर मणियार, डॉ.भीमाशंकर नकाते, मुख्याध्यापक शिवप्रसाद भंडारे, संतोष देशमुख यांची उपस्थिती होती. प्रारंभी लोकनेते विलासरावजी देशमुख यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या शिबिरात ९१ बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांची आरोग्य व रक्त तपासणी डॉक्टरांच्या पथकाकडून करण्यात आली. यावेळी डॉक्टर चेतन सारडा यांनी बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्व पटवून देत विलासरावजी देशमुख यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. सूत्रसंचालन योगिता चौधरी यांनी केले. आभार रमण गौड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवदास लोखंडे, श्याम सुरवसे, किशोर सास्तुरकर यांच्यासह सदासुख हॉस्पिटल व मतिमंद विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments