Latest News

6/recent/ticker-posts

किडनी शस्त्रक्रियेवरून ममता हॉस्पिटलवर गंभीर आरोप; डॉक्टरांचे स्पष्टीकरण...

किडनी शस्त्रक्रियेवरून ममता हॉस्पिटलवर गंभीर आरोप; डॉक्टरांचे स्पष्टीकरण...


लातूर : शहरातील ममता हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेनंतर माझ्या शरीरातून किडनी न सांगता काढल्याचा गंभीर आरोप छमन पठाण (रा. नायगाव, ता. चाकूर) यांनी ८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. पठाण यांनी सांगितले की, ऑगस्ट २०२४ मध्ये मुतखड्याचा त्रास होत असल्याने त्यांनी लेझर ऑपरेशनसाठी ममता हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची मागणी केली होती. मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या शरीरातून किडनी काढण्यात आली, असा आरोप त्यांनी उपस्थित पत्रकारांसमोर केला. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष सुनील सौदागर उपस्थित होते.

दरम्यान, छमन पठाण यांच्या आरोपांवर ममता हॉस्पिटलचे डॉक्टर विश्वास कुलकर्णी यांनी तात्काळ दुपारी ४:०० वाजता भालचंद्र ब्लड बँक येथे पत्रकार परिषद घेतली. डॉ. कुलकर्णी यांनी सर्व आरोप फेटाळले असून, शस्त्रक्रियेपूर्वी व शस्त्रक्रियेदरम्यान लागणारी सर्व वैद्यकीय प्रक्रिया आणि कायदेशीर सोपस्कार पूर्णपणे पाळले असल्याचे स्पष्ट केले. सदर प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी छमन पठाण यांनी केली असली तरी, हॉस्पिटल प्रशासनाने सर्व कार्यवाही वैध पद्धतीने पार पाडल्याचा उच्चार केला आहे. या विवादामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

Post a Comment

0 Comments