Latest News

6/recent/ticker-posts

दत्ता सोमवंशी यांची लातूर विभागीय सचिव पदावर फेरनिवड

दत्ता सोमवंशी यांची लातूर विभागीय सचिव पदावर फेरनिवड


लातूर
: महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनची नागपूर येथे नुकतीच झालेली बैठक यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत लातूर येथील दत्ता सोमवंशी यांची लातूर विभागीय सचिवपदी फेरनिवड करण्यात आली आहे. नागपूर येथे पार पडलेल्या राज्य संघटनेच्या बैठकीत विविध कार्यकारणी सदस्यांची निवड झाली. अध्यक्षपदी नागपूरचे विजय डांगरे यांची नियुक्ती करण्यात आली, तर सचिवपदी पुण्याचे निलेश जगताप यांची निवड झाली आहे. लातूर विभागासाठी दत्ता सोमवंशी यांची फेरनिवड झाली आहे.

या निवड प्रक्रियेत राज्यातील ३६ जिल्ह्यांतील अध्यक्ष व सचिवांनी सहभाग घेतला. ऍडव्होकेट विवेक केदार आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे निरीक्षक प्रा. प्रमोद चांदुरकर यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. दत्ता सोमवंशी यांच्या फेरनिवडीचे स्वागत जिल्हा संघटनेचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते मोईज शेख, उपाध्यक्ष महेश पाळणे, सहसचिव मुजीब सय्यद, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, क्रीडाधिकारी कृष्णा केंद्रे, विक्रम पाटील, लिंबराज बिडवे, प्रवीण तावशिकर, विजय सोनवणे, नागेश जोगदंड यांसह व्हॉलीबॉलप्रेमी आणि जिल्हा संघटनेचे पदाधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments