Latest News

6/recent/ticker-posts

काळेगाव येथील रिझवानाबेगम जागीरदार यांचे निधन

 काळेगाव येथील रिझवानाबेगम जागीरदार यांचे निधन


अहमदपूर : तालुक्यातील काळेगावचे रहिवाशी नसीबोद्दीन जागीरदार यांच्या पत्नी रिझवानाबेगम जागीरदार (वय -५७) यांचे अल्प आजाराने मंगळवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता निधन झाले. इन्ना लिल्लाही व इन्ना इलैही राजिऊन. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार (दफनविधी) काळेगाव येथे स्थानिक कब्रस्थानमध्ये सायंकाळी ५ वाजता, असर नमाजेनंतर करण्यात येणार आहे. रिझवाना बेगम यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, जावई तसेच नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जागीरदार व पटेल कुटुंबियात शोककळा पसरली आहे. त्या राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा माजी आमदार पाशा पटेल यांच्या लहान बहिणी होत तसेच शिक्षणमहर्षी मुजीब पटेल यांच्या वहिनी होत.

Post a Comment

0 Comments