जिल्हास्तरीय शालेय वूशु क्रीडा स्पर्धेत निटूरच्या विद्यार्थ्यांचे यश
लातूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय वूशु क्रीडा स्पर्धा सन 2025-26 संपन्न झाली. ही स्पर्धा दिनांक 3 सप्टेंबर रोजी लातूर येथील क्रीडा संकुलात भरविण्यात आली.
या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय, निटूर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. मुलांच्या गटातून पवार ज्ञानेश्वर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर मुलींच्या गटातून आरती घोरपडे हिने प्रथम स्थान मिळवले. तसेच मुलांच्या गटातून संगम माळी द्वितीय तर मुलींच्या गटातून प्रतीक्षा माळी हिला द्वितीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारे पवार ज्ञानेश्वर व आरती घोरपडे यांची धाराशिव येथे होणाऱ्या विभागीय शालेय वूशु स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर, पत्रकार के वाय पटवेकर, मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना एन. एम. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.



0 Comments