Latest News

6/recent/ticker-posts

मुद्दस्सर अलींना एम.जी.एम. युनिव्हर्सिटी कडून फूड टेक्नॉलॉजिस्ट पदवी

मुद्दस्सर अलींना एम.जी.एम. युनिव्हर्सिटी कडून फूड टेक्नॉलॉजिस्ट पदवी


धाराशिव : येथील युवक मुद्दस्सर अली डॉ. इकबाल सय्यद यांनी आपली मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी एम.जी.एम. युनिव्हर्सिटी, औरंगाबाद येथून 26 सप्टेंबर 2025 रोजी फूड टेक्नॉलॉजिस्ट ही पदवी प्राप्त केली आहे. फूड टेक्नॉलॉजीसारख्या आधुनिक आणि व्यापक संधी निर्माण करणाऱ्या क्षेत्रात उल्लेखनीय पाऊल टाकून त्यांनी आपल्या कारकिर्दीस नवे दालन उघडले आहे.

या यशाकडे धाराशिव व परिसरातील नागरिकांनी अभिमानाने पाहिले असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. परिश्रम व सातत्याच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्राची झपाट्याने वाढ होत असताना मुद्दस्सर अली यांचे हे पाऊल भविष्यातील करिअरसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. मुद्दस्सर अली डॉ. इकबाल सय्यद यांना त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व उत्तरोत्तर यशासाठी मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments