अतिवृष्टीग्रस्तांसाठी छावा मराठा युवा महासंघाचा मदतवाटप उपक्रम
निलंगा :{प्रतिनिधी/रहीम मणियार} निलंगा तालुक्याला झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. या अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने छावा मराठा युवा महासंघ, शिवसेना उबाठा गट आणि मातोश्री सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने निलंगा तालुक्यातील मुगाव व शेंद या नदीकाठावरील गावांमध्ये मदतवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी या गावांतील काही नागरिकांना धान्याचे किट वाटप करण्यात आले तर जिल्हा परिषद शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून प्रोत्साहन देण्यात आले.
या कार्यक्रमास छावा मराठा युवा महासंघ, पुणे चे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर तुकडीकर, प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील निलंगेकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष विष्णू बिरादार, शशीकांत शिरमाळे, रहीम मनियार, अहमद पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मुगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शेंद जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुंडे सर, बालाजी बिराजदार, जाधव साहेब, सतीश कोळेकर, रमेश तातेराव मोगरगे, तंटामुक्त अध्यक्ष श्रीनिवास मोगले आदींसह दोन्हीही गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
0 Comments