राज्यशालेय तायक्वांदो स्पर्धेत धाराशिवचा चमकदार ठसा
संस्कृती कपाळे सुवर्णपदक विजेती; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
धाराशिव : छत्रपती संभाजीनगर येथे दि. 13 ते 16 ऑक्टोबरदरम्यान झालेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एक सुवर्ण आणि पाच कांस्यपदकांची कमाई केली. १७ वर्षांखालील मुलींच्या ३२ किलो वजनी गटात अभिनव इंग्लिश स्कूलची संस्कृती कपाळे हिने प्रभावी खेळ सादर करत सुवर्णपदक पटकावले. तिच्या या यशामुळे ती इटानगर (अरुणाचल प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
स्पर्धेत अनुराग पाटील, स्वरा कांबळे, ऋत्विक ठाकर, हर्षवर्धन शिंदे आणि ऋतुराज मोरे यांनी कांस्यपदके मिळवून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. या यशस्वी खेळाडूंचे धाराशिव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, उपाध्यक्ष जी. बी. कासराळे, सचिव राजेश महाजन, सहसचिव सूर्यकांत वाघमारे तसेच अनिल बळवंत आणि रवी जाधव यांनी अभिनंदन केले. विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक राजेश महाजन, राम दराडे, माधव महाजन, सुमेध चिलवंत आणि स्मिता गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments