लातूरच्या पाण्यात जलकौशल्याची चमक, मुंबई विभागाची विजयी झेप
१९ वर्षाखालील मुलींच्या ५० मी बॅक स्ट्रोक क्रीडा प्रकारातील विजेत्या खेळाडूंना पदके प्रदान करताना कमी वयात जगातील सर्व खाड्या पोहणारी कु. रूपाली रेपाळे… विजेते खेळाडू १. राघवी रामानुजन, मुंबई २. सौम्या गवाणकर, मुंबई ३. आदिती पायासी
लातूर : राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात संपन्न झालेल्या राज्यस्तर शालेय जलतरण स्पर्धेत मुंबई विभागाने प्रभावी कामगिरी करत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. मुंबईने ४१ सुवर्ण, ३२ रौप्य व २२ कांस्य पदकांची कमाई केली. पुणे विभागाने २२ सुवर्ण, २३ रौप्य आणि २० कांस्य पदकांसह द्वितीय, तर शिवछत्रपती क्रीडापीठ विभागाने ६ सुवर्ण, १० रौप्य व १० कांस्यपदकांसह तृतीय स्थान मिळविले.या स्पर्धेत राज्यभरातील जलतरणपटूंनी प्रखर स्पर्धा निर्माण केली. १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींमध्ये पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि नागपूरच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. मुंबईच्या मैत्रेय सावंत, आर्यन चिखणे, ओम साटम, पुण्याच्या आयुष गायकवाड, शाल्व मुळे, झील मलाणी, तर कोल्हापूरच्या अथर्वराज पाटील यांनी सुवर्णपदके पटकावीत आपापल्या विभागांचा मान उंचावला.
राज्यभरातील प्रतिभावान खेळाडूंच्या सहभागामुळे लातूरमधील या जलतरणस्पर्धेचे रंग अधिक खुलले. उत्कंठावर्धक शर्यतींनी प्रेक्षकांना चांगलेच मोहून टाकले. महाराष्ट्राच्या जलतरण क्रीडेचा पाया भक्कम करणाऱ्या या राज्यस्तर स्पर्धेचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडल्याने आयोजक, अधिकारी व स्पर्धकांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
0 Comments