अंबाजोगाई ग्रामीण डीबी पथकाची धडाकेबाज कार्यवाही; आरोपीसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त
अंबाजोगाई : अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत ४० लाखांचा मुद्देमाल आणि आरोपींना ताब्यात घेत धडाकेबाज कारवाई केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रितेश दुर्गाप्रसाद सोनी (रा. हिंगोली) यांनी दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांनी सांगितले की, हिंगोली येथून सांगलीकडे जाण्यासाठी ३० टन हळद (किंमत रु. ४१,७५,५३५) घेऊन निघालेला ट्रक (क्रमांक एमएच २६ एडी २९३५) हा दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी लोखंडी सावरगाव परिसरात अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी जबरदस्तीने अडवून, ट्रकचालक सय्यद अजगर यास मारहाण करून, ट्रक चोरीस नेला.
तपासादरम्यान पोलिसांना समजले की ट्रकचालक सय्यद अजगर आणि ट्रक मालक नदीम खान यांनीच या प्रकरणात बनावट व खोटा प्रकार रचून, विश्वासाने सोपवलेली हळद स्वतःच अपहार करीत खोटी माहिती दिली. यानुसार अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३२/२०२५, कलम ३१६(२), ३१६(३), ३१८(४), २१७, ३(५) भारतीय न्यास संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रंगनाथ जगताप यांच्याकडे देण्यात आली. या धक्कादायक फसवणूक प्रकरणातील आरोपी आणि मुद्देमाल शोधण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नवनीत कावट, अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके व उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी एक तपास पथक तयार केले. गुन्हे शोध पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक असद शेख, एएसआय रमेश शिरसाट, व हवालदार किसन घोळवे यांच्या पथकाला परभणी येथे रवाना करण्यात आले.
पथकाने परभणी जिल्ह्यात अत्यंत शिताफिने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले आणि चोरी गेलेली ५७० पोती हळद (कीमत सुमारे ४० लाख रुपये) अवघ्या २४ तासांत हस्तगत केली. आरोपी आणि मुद्देमाल पोलीस स्टेशन अंबाजोगाई ग्रामीण येथे हजर करण्यात आले. या यशस्वी कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक नवनीत कावट, अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश शिंदे, तसेच पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या डीबी पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले, तपासी अधिकारी रंगनाथ जगताप, डीबी पथकाचे असद शेख, पोलिस उपनिरीक्षक रहीम चौधरी, एएसआय रमेश शिरसाट, पोहेका किसान घोळवे, बाबुराव घुगे, प्रवीण उळे, बळीराम बासर, कल्याण देशमाने, नारायण गायकवाड, संग्राम सांगवे, शुभम राऊत, धम्मानंद वाव्हळ, रवी चव्हाण, जयदीप कसबे, राहुल भोसले, नवनाथ मुंडे, जसवंत शेप, बाबासाहेब डोंगरे आणि विवेकानंद सोळंके यांनी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सन्मान करण्यात आला आहे.



0 Comments