तायक्वांदो जिल्हास्तरीय कलर बेल्ट परिक्षेत ‘नई जिंदगी क्लब’ च्या खेळाडूंचे यश
सोलापूर : शहरातील कमर हॉल, नई जिंदगी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो कलर बेल्ट परीक्षेत ‘नई जिंदगी क्लब’ च्या मुला-मुलींनी घवघवीत यश संपादन केले. मुलांच्या गटात मोसेफ शेख, इजाज जहाँभाई, हुजेफ शेख, जुनेद मणियार, हर्षद मिर्झावाले, अफशान जहाँभाई, ओसामा नंदाफ, हुजेफ मिर्झावाले, मॉज शेख, मोहम्मद सिद्दी जहाँभाई, अम्मार पठाण, अफताब शेख, उमर अत्तार, सुफियान चपाटले, आयान शेख, जैद साहेब आणि जाहिद साहेब या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. तर मुलींच्या गटात आलीजा शेख, रुकसार शेख, समिदा जहाँभाई, अल्फिया मणियार, आनम जहाँभाई, अरफा जहाँभाई, कारिया जहाँभाई आणि बुशरा तांबोळी यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत उत्तीर्णता प्राप्त केली.
या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य प्रशिक्षक सईद सय्यद आणि सोमनाथ दिक्षीत यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोलापूर जिल्हा तायक्वांदो संघाचे अध्यक्ष मोहन भुमकर, जिल्हा सचिव मंजूर शेख, शहर सचिव अझरुद्दीन जागीरदार, जमियत उलमा हिंद ‘नई जिंदगी’चे सदर मौलाना अब्दुल करिम कासमी, मोहसिन तांबोळी, मैनोद्दीन पठाण, मुदस्सर साहेब, तौसिफ नंदाफ, जिल्हा खजिनदार प्रतिक्षा खंडाळकर तसेच भाजप माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहन भुमकर, मंजूर शेख, अझरुद्दीन जागीरदार, मैनोद्दीन पठाण, मौलाना अब्दुल करिम कासमी आणि जावेद अत्तार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सोमशेखर भोगडे आणि जावेद अत्तार यांनी केले.


0 Comments