Latest News

6/recent/ticker-posts

अहमदपूर तालुक्यात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही

अहमदपूर तालुक्यात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही


लातूर/अहमदपूर : आज दिनांक 06.10.2025 रोजी दुपारी ११.५५ ते १२.०५ मिनिटांदरम्यान मौजे सलगरा, तालुका अहमदपूर परिसरात भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, जिल्हा प्रशासनाने त्वरित नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडे तपासणीसाठी पाठपुरावा केला.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) कडून करण्यात आलेल्या तपासणीनुसार, अहमदपूर तालुक्याच्या भौगोलिक कार्यक्षेत्रात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नाही. जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये. परिस्थिती पूर्णपणे सामान्य असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सतर्क आहे.

Post a Comment

0 Comments