Latest News

6/recent/ticker-posts

इंटरनॅशनल फुनाकोशी शोतोकान कराटे असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय कराटे स्पर्धा उत्साहात

इंटरनॅशनल फुनाकोशी शोतोकान कराटे असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय कराटे स्पर्धा उत्साहात 

लातूर : येथील खाडगाव मंगल कार्यालयात इंटरनॅशनल फुनाकोशी शोतोकान कराटे असोसिएशन (IFSKA) च्या वतीने १२ वी महाराष्ट्र स्टेट ओपन कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेचे आयोजन असोसिएशनचे अध्यक्ष सिहान अजमेर शेख व उपाध्यक्ष रविकुमार शिंदे यांनी केले होते. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील कराटेपटू आणि प्रशिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. आनंद पवार, डॉ. अजहर पठान, डॉ. विवेक व्ही. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण प्रदर्शनाने स्पर्धा रंगतदार बनली. विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभात एम.एच. २४ प्रोडक्शनचे फिल्म निर्माते आदरणीय दत्ताभाऊ जवळगे, ऐश्वर्या ज्वेलर्सचे मालक रमेश पाटील (झरीकर), कमलाकर बोई, जिवन वाघमारे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुरेखाताई गिरी, अॅड. रामेश्वर सगरे, बाबाजी जायभाये, विशांत कांबळे, अतीफ पटेल, अजित ढोले, रेहान शेख, सुजीत गायकवाड आदी सह पंच व आयोजकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या सहकार्याने स्पर्धा अत्यंत यशस्वीपणे पार पडली.

Post a Comment

0 Comments