Latest News

6/recent/ticker-posts

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या पोलिसावर कारवाई ची अल्पसंख्यांक बहुभाषिक पत्रकार संघाची मागणी

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या पोलिसावर कारवाई ची अल्पसंख्यांक बहुभाषिक पत्रकार संघाची मागणी


लातूर:(प्रतिनिधी) येथील पत्रकार किशोर सोनकांबळे हे बुधवार दिनांक २६ मे रोजी शहरातील गंज गोलाई परिसरात बातमी बरोबरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मास्कची विक्री करत असताना यावेळी गांधी चौक पोलिस ठाण्याचे अधिकारी हिबारे यांनी दमदाटी करून मारहाण केली त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी पत्राद्वारे अल्पसंख्यांक बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष के. वाय. पटवेकर यांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्या कडे केली आहे.या. निवेदनात पुढे म्हंटले आहे की, पत्रकार किशोर सोनकांबळे हे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी घरी तयार केलेले मास्क कमी दराने दहा रुपये प्रमाणे फिरून विकत होते, त्याच वेळी पोलीस कर्मचारी हिबारे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली ही घटना निंदनीय आहे, त्याची चौकशी करून तत्काळ कारवाई करावी असेही नमूद करण्यात आले आहे.या निवेदनाच्या प्रती, मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृह मंत्री अनिल देशमुख, लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनीही पाठवण्यात आल्या आहेत.


Post a Comment

0 Comments