Latest News

6/recent/ticker-posts

हॉकर्स व्यवसाइकाना जागा उपलब्ध करू द्या; स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेची मागणी

हॉकर्स व्यवसाइकाना जागा उपलब्ध करू द्या; स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेची मागणी


 लातूर:(प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षापासून लातूर शहरतील विविध ठिकाणी आपल्या उदर्निर्वाहासाठी हतगाड़ा व्यापारी बार्शी रोड , एम् आई डी सी , शिवजी चौक , रेनापुर नाका , बस स्टैंड, गाँधी मैदान, गंज गोलाई, अण्णाभाऊ साठे चौक, विवेकानंद चौक ,बसवेश्वर चौक, कव्हा नाका , राजीव गाँधी चौक येथे फळ व भाजीपाला विकरी करुण आपला उधरनिर्वाह करत असतात. लॉक डाऊन मुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे, शहरात आज ३ooo हुन अधिक व्यवसायिक आहेत. लॉक डाउन चा चौथा टप्पा चालू असला तरी प्रशासनाने अद्याप त्यांच्या बाबतीत कोणतीहि दाखल घेतलेली नाही.मोठ्या उद्योजकांच्या बाबतीत प्रशासन विचार करीत आहे,त्यांना रोटेशन पद्धतीने परवानगी देण्यात आली,ज्यांचे हातावर पोट आहे अशांचाही विचार व्हावा,


हातगाडा व्यावसायिकांचा व्यवसाय हा शेतकऱ्यांशी निगडित आहे. नागरिकांनाही लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू आहेत. हातगाडा व्यावसायिकांचे पोट हि यावरच अवलंबून आहे. गेल्या दोन महिन्या पासून या हातगाडा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. एक हातगाडा धारकावर ५ ते ७ लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. म्हणून .... 


विविध चौकातील हातगड धारकास विकरीची परवानगी द्यावी


हातगाडा वाल्याना प्रत्येक चौकात रोटेशन पद्धतीने व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी.


विकरी करणाऱ्या हॉकर्स ना विकरीचे प्रमाणपत्र द्यावे


गंज गोलाई मुख्य बाजारपेठ असल्यामुळे रोटेशन पद्धतीने सोशल डिस्टंसीग चे पालन करत व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी 


फेरीवाला धोरणाची त्वरित अंमलबजावणी करावी 


तरी माननीय साहेबानी सदरील प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून सदरील प्रकरणी योग्य ते निर्णय घ्यावे, जेणेकरून हातगाडा धारकांवर उपासमारीची वेळ येणार नाही.


सदरील प्रकरणावर आपण गांभीर्याने विचार करावा अन्यथा आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून    


दि .०१.०६.२०२० रोजी लातूर म.न.पा समोर सोशल डिस्टंसीग चे पालन करत आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी मुस्लीम विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मोहसीन खान जिल्हाध्यक्ष लातूर शेख शादुल यांनी लातूर शहर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.


Post a Comment

0 Comments