Latest News

6/recent/ticker-posts

काळजाच्या कप्प्यातुन.....

काळजाच्या कप्प्यातुन.....



       मानवी आयुष्यात तारूण्य एक अशी अवस्था आहे ज्या अवस्थेत अनेकांचा तोल घसरतो. अनेकांचे जगण्याचे मार्गच बदलतात कधी कधी मनावर संतुलन न राहील्याने श्रावणात बहरणा-या हिरवळीचा अचानक वाळवंटात रूपांतर व्हावे आणी सारे उजाङ, ओसाङ व्हावे तसे काही जनांचे जिवन उद्ध्वस्त होते. आणी मग ती व्यक्ती वेदनांचे ओझे सोबत घेऊन कुणाच्या तरी आठवणीच्या भुतकाळात आपलं वर्तमान व भविष्य हरवुन जिवन निरस पणे जगत रहाते. का होतं अस्सं आपण कधीच कोणाचही न वाटोळे करता आपलच भाग्य आश्रुंच्या वादळात का रखङले, भरकटले जाते. त्याला कारणच आहे आपण चुकीच्या वेळी, चुकीच्या व्यक्ती सोबत घेतलेला चुकीचा निर्णय .....


   एक उमलणारं फुलही ज्या ज्वालेत,अग्नीत भाजलं झालं आणी ज्यात त्याचा कोळसा होतो. त्याला दिलवाले.....प्रेमवाले .... प्रेम म्हणतात.


    ज्या एवढ्याच्या अङीच अक्षराच्या शब्दाचा पाठलाग करताना आजवर अनेक जिव थकले एवढेच नव्हे तर अनेकजन यातच मिटले हि त्यांच्या सदियो पुराण्या प्रेमगाथा आजही इतिहास बनुन आपल्या समोर आहेत. 


  आज आपण तारूण्याच्या वया बाबत संदर्भ घेत आहोत. मित्रहो हेच वय असतं नेमकं स्वप्न बघण्याचे आणी आकाशात भरारी घेण्याचे शिकून - सवरून मोठं होण्याचे पण काही जणांचं मन याच वयात नेमकं कुणाचं तरी' दिवानं' होतं आणी चालु होतो. नजरा नजरीचा' सिलसिला' आता नकळत आपलं काळीज कोणीतरी नकळतच चोरलेलं असतं....तेही आपणास पुसटशी कल्पनाही न देता. आपलच मन आता त्याचं वेङं झालेलं असतं. आपल्याच ' भावना ' आता त्याच्याच झालेल्या असतात. आणी आपलेच ङोळे आता त्याचेच स्वप्न बघत असतात. आपणास नकळत असा एक ' रोग ' जङलेला असतो ज्यात काळीज तर आपलं असतं पण त्यावरील ' स्पंधन ' किंवा ' धङकन ' सारखं त्यालाच आवाज देत असते. हजारो ण माणसातही आपली नजर आता भविष्य व स्वप्नाच्या जागी कोणाचातरी शोध घेत भरकटत असते. जसं तिन्ही सांजेला आकाशात घोळक्यात असुनही ' पाखरं ' आपापलं घरटं शोधत असतात.........


   आपल्याही मनाची तिच अवस्था होते. कसच्याच ' भान ' रहात नाही कि तहान रहात नाही. जगणारा जिव आपलाच असतो मात्र ' श्वास ' कोणाच्यातरी नावाने जगत असतो. म्हणुन मित्रांनो तारुण्याच्या उंबरठ्यावर मनालाही जपत चला , भरकटणा-या भावने पासुन जरा लपत चला. निव्वळ फोटो काढण्यासाठी ' निखा-यावर ' पाय ठेवण्याचा नकळत प्रयत्न करू नका निखारा आणी प्रेम सारखच असतं एकात नाजुक पाय भाजतात तर दुस-यात ' फुलासारखं ' कोमलं आणी तितकच नाजुक ' काळीज ' करपण्याचा धोकाही असतो......


 आज इतकच म्हणून म्हणतो.....


 प्रेम.....


प्रेम....... समजायला अख्खं आयुषही अपुरं आहे. तो भावनेच्या भरात घेतलेला निर्णय कदाचीत जगण्याचा मार्गही बदलू शकतो.....


 म्हणुन फुलं तोङताना काटे टोचणार आहेत याचही भान ठेवत चला....


 बाबूराव आगलावे(पत्रकार) 


भ्रमणध्वनी: ७२१८३०१९००


Post a Comment

0 Comments