वाढदिवसाच्या शुभेच्छा मला घरूनच द्यावेत- अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर
निलंगा:(प्रतिनिधी) संपूर्ण जगभरात कोरोनाच्या महामारीने हैदोस घातला आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागात हा विषाणू पाय पसरू पाहत आहे लातुरात शुन्यावर असणाऱ्या रूग्नांची संख्या आता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे या पार्श्वभूमीवर आशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर(सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस) यांनी लातुर जिल्ह्यातील रुग्णांची Covid-19 वाढत्या संख्येच गांभीर्य ओळखून चाहते कार्यकर्त्यांनी ह्या वर्षीचा वाढदिवस घरीच सुरक्षित राहून सोशल मिडीयाच्या माध्यमातून साजरा करावा असे आवाहन केले आहे.
मी सध्या Home Quarantine आहे.
दि. २९ जुलै वार. बुधवार रोजी माझा वाढदिवस आहे.सध्या आपल्यावर करोना Covid-19 या संसर्गजन्य रोगाने आपण त्रस्त आहोत व दादासाहेबांची प्रकृती अस्वस्थामुळे हाँस्पीटल मध्ये ऊपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती चांगली आहे. आपल्या शुभेच्छा मला घरूनच द्यावेत आपण यावेळी वाढदिवस साजरा करु नये व घरीच सुरक्षित राहून सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा द्या
आपले आशीर्वाद माज्या सोबत आहेत.
सदैवआपलाच
अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर
(सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी)
0 Comments