Latest News

6/recent/ticker-posts

इन्फ्रारेड थर्मामीटर गन,पल्स ऑक्सिमिटर उपकरण देऊन त्यांच्या वापराबद्दल प्रात्यक्षिके

इन्फ्रारेड थर्मामीटर गन,पल्स ऑक्सिमिटर उपकरण देऊन त्यांच्या वापराबद्दल प्रात्यक्षिके



लोहा:(प्रतिनिधी) महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामध्ये असणाऱ्या नांदेड मधील लोहा तालुक्यातील पारडी गावात ग्रामपंचायत कार्यालय पारडी मार्फ़त ग्राम विकास अधिकारी ढगे यांच्या हस्ते गावकऱ्यांची CONID-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून थर्मल स्क्रीनिंग गन तसेच पल्स ऑक्सी मीटर हे उपकरण गावातील आशा वर्कर कमल ताई कदम व अंगणवाडी सेविका शारदा डीकळे यांना देण्यात आले. यावेळी VSTF चे ग्राम परिवर्तक सागर तापडिया यांनी हे दोन्ही उपकरण कसे वापरावे तसेच वापरत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याच्या बद्दल विस्तृत मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक करून दाखविले आणि प्रत्यक्ष स्क्रिनिंग चालू झाली. गोळा केलेली सर्व माहिती एका रजिस्टरमध्ये नोंदविण्यात येत आहे.यावेळी ग्रामपंचायत सेवक शंकर डीकळे , अंगणवाडी सेविका शारदा डीकळे आशा वर्कर कमल कदम इत्यादी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments