Latest News

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टामोड येथे रक्तदान शिबिर 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टामोड येथे रक्तदान शिबिर 



चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) आज संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने कहर केला आहे.अनेक ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांना रक्तचा तुटवडा जाणवत आहे.अशा परिस्थितीत चाकुर तालुक्यातील आष्टामोड गावात महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसां निमित्त रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदांने शिबिरांचे उदघाटन लातुर जिल्हा शिवसेना प्रमुख नामदेव चाळक होते.तर अध्यक्ष माजी जिल्हा प्रमुख सुभाषदादा काटे होते.प्रमुख अतिथी सभापती,जिजाऊ प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यांचे संख्यापक अध्यक्ष गोपाळ माने,युवासेना जिल्हा प्रमुख कुलदीप सुर्यवंशी,दिलीप पाटील,पञकार सुधाकर हेमनर उपस्थित होते. चाकुर तालुका प्रमुख गुणवंत पाटील यांच्या पुढाकाराने हे शिबिर संपन्न झाले.चाकुर तालुक्यातील ५० जणांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवला.महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या वाढदिवसां निमित्त रक्तदान करुन साजरा करावा असे आहवान केले होते.त्यांचा आहवानाला प्रतिसाद म्हणून आष्टामोड येथे रक्तदान शिबिर घेऊन दिले असे शिवसेना चाकुर तालुका प्रमुख म्हणाले मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच वाढदिवस आम्ही सामाजिक उपक्रमांने साजरा केला.चाकुर तालुक्यातील आजी माजी शिवसेना प्रमुख पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments