तडका
गृहमंत्री
थोडसं खोखलं,नाक ओढल,
बायको तोंड येगळेच वेंगाडते
काल तुम्ही कोणाकडे गेलता
कोरोणाची भीती हिला वाटते
सलगीचा प्रयत्न करूच नका
मास्क शिवाय बोलायचं नाही
कोरोणा गेल्यावर बोला म्हणते।
गुमान झोपायलाच सांगते।
घरात हिचे रोजच टोमणे,
जीव मेथाकुटीलाच येतो।
किराणा, भाजीपाला, दळण
आणखी झाडू मारा म्हणते।
राजाभाऊ सोमवंशी(निटूरकर)
भ्रमणध्वनी: ९५२७०६७४६७
0 Comments