देवणी न.प.चे मुख्याधिकारी विरोधात
पञकारांच्या वतीने राज्यपाल व विभागीय आयुक्ताना देवणी तहसीलदारा मार्फत निवेदन
देवणी:(प्रतिनिधी) पञकार जाकीर बागवान हे दिनांक १६ जुलै रोजी दुपारी हे वृत्तसंकलनासाठी देवणी येथील बोरोळ चौकात गेले असता तेथे उभे आसलेले देवणी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी मागील बातमीचा राग (चिड) मनात धरुन पञकार जाकिर बागवान यांना तुम्ही येथे थांबायचे नाही,तुम्ही बातमी करायची नाही,तुम्ही थांबल्यास तुमच्या दुचाकिची हवा सोडून देतो तुमच्यावर दंडात्मक कारवाई करतो म्हणून अपमानास्पद वागणूक देऊन हाकलून लावले देवणी तालुक्यातील पञकार गेल्या अनेक वर्षापासून प्रसार माध्यमातून कार्य करीत आहेत माञ गेल्या मार्च २०२० पासुन जागतिक कोरोना महामारीत पञकारांनी फिजिकल डिस्टन्स ठेवून बातमी संकलनाचे व सामाजिक घडामोडीचे अवलोकन करून बातम्या संकलन व प्रसारण करण्याचे काम करित आहेत परंतु काम करीत असताना देवणी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडुन हेतुपरस्पर आपमान करून पञकारांचे मानसीक खच्चीकरण करीत आहेत असे प्रकार वर्षभरात तालुक्यातील अनेक पञकारांसोबत घडले आहेत असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत व संबंधित आधिका-यावर योग्य ती कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन पञकारांच्या वतीने देवणी तहसीलदारा मार्फत राज्यपाल साहेब व विभागीय आयुक्त साहेब औरंगाबाद यांना देण्यात आले आहे तर यानिवेदनाची माहितीस्तव प्रत म्हणून मुख्यमंत्री साहेब मुंबई ,गृहमंत्री साहेब मुंबई,विरोधी पक्षनेते मुंबई ,पालकमंञी लातुर,जिल्हाधिकारी साहेब लातुर,पोलीस अधिक्षक लातुर यांना देण्यात आले आहे या निवेदनावर पञकार जाकिर बागवान,दत्ता पाटील,अन्वरखाँ पठाण,सतीष बिरादार,महमद रफी सौदागर,अविनाश कटके,शकिल मनियार, प्रताप कोयले,प्रा रेवण मळभगे , बाबासाहेब उमाटे,नरेश बिरादार,लक्ष्मण रणदिवे,प्रा.नरसींग सुर्यवंशी,बालाजी टाळीकोटे,कृष्णा पिंजरे,बालाजी कवठाळे,हसन मोमीन,शादुल बौडीवाले,सागीर मोमीन,अमरदीप बोरे,सुधाकर जाधव,सय्यद शफीक,शेख खाजा, इत्यादींच्या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत.
0 Comments