Latest News

6/recent/ticker-posts

शासकीय व खाजगी रूग्णालयातील बेडची उपलब्धता समजण्यासाठी संकेतस्थळ विकसीत


शासकीय व खाजगी रूग्णालयातील बेडची उपलब्धता समजण्यासाठी संकेतस्थळ विकसीत


लातूर:(प्रतिनिधी) कोवीड-१९ साथीच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभुमिवर लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयात बेडची उपलब्धता लक्षात येण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या संकेत स्थळावर ‘डॅश बोर्ड’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, शासकीय योजनांचा लाभ कोणत्या रुग्णालयात मिळू शकतो याचा तपशीलही त्याठिकाणी देण्यात आला आहे, जिल्ह्यातील नागरिकांनी रूग्णालयात जाण्यापूर्वी या संकेतस्थळाला भेट द्यावी व आपली गैरसोय टाळावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.


  कोवीड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनतेची गैरसोय टाळण्यासाठी कोवीड आणि नॉन कोविड रुग्णावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची माहीती एकत्र उपलब्ध करावी, कोणत्या रुग्णालयात सध्या बेड शिल्लक आहेत आणि शासकीय योजनांसाठी कोणती रुग्णालय पात्र आहेत याचा तपशील जनतेसाठी खुला करावा अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत केली होती.


  पालकमंत्री पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्हा शल्य चिकित्सकानी https://covid19bedinfo.cslatur.in/ या नावाने संकेतस्थळ विकसित केले असून या संकेतस्थळावर गेल्यानंतर Real-Time Hospital Bed Availability पर्यायाला क्लिक केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटलची माहिती उपलब्ध होते. कोणत्या हॉस्पिटलमध्ये सध्या किती रुग्ण उपचार घेत असून किती बेड रिकामे आहेत हेही लक्षात येते. त्यामुळे रुग्णाला सोयीच्या हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार मिळण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. जिल्हयात शासकीय आणि खाजगी रुग्णालयात एकूण ४१४ हाऊस्पीटल असुन या सर्व हॉस्पिटलमध्ये सर्वसाधारण उपचाराचे एकूण ७६५६ तर आयसीयू ३४६ बेड उपलब्ध आहेत. या सर्व रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाची दररोजची माहिती अद्ययावत ठेवण्यास सांगण्यात आले आहे. 


शासकीय योजनांचा लाभ मिळणारी रुग्णालय


जिल्ह्यातील शासकीय रुग्णालया बरोबरच, अनेक खाजगी रुग्णालयात १ एप्रिल २०२० पासून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व पंतप्रधान जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे. या रुग्णालयाची माहितीही या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर उपलब्ध about हा पर्याय क्लिक केल्यावर या योजनेचा लाभ मिळणाऱ्या हॉस्पिटलची माहिती उपलब्ध होते. या योजनेच्या लाभा संदर्भात अगोदर माहिती घेऊनच रूग्णालयात दाखल झाल्यास रुग्णांचा मनस्ताप कमी होतो. शिवाय आर्थिक अडचणी निर्माण होत नाही, त्यामुळे अशा रुग्णांनी माहिती घेऊनच दाखल व्हावे असे आवाहन पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी केले आहे.


रेशन कार्ड आधार कार्ड सोबत ठेवावे रुग्ण कोवीड-१९ पॉझिटिव असो की नॉन् पॉझीटीव्ह त्यांनी रुग्णालयात जाताना शक्यतो रेशनकार्ड आणि ओळखपत्र सोबत ठेवावे असे आवाहनही पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे. रूग्णालयात खर्चासाठी शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी ही कागदपत्र अनिवार्य असल्याने नंतर रुग्णाची धावपळ होत नाही. याशिवाय रुग्ण कोवीड-१९ पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या कुटुंबाची तपासणी करून त्यांना सुरक्षित करण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरते असेही त्यांनी म्हटले आहे.


Post a Comment

0 Comments