वृत्तसंकलनासाठी पत्रकारांना मुभा; पण काळजी घ्यावी
देवणी:(प्रतिनिधी) तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यादृष्टीने प्रशासन जिवाचे रान करुन लाँकडाऊन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे.दरम्यानच्या काळात प्रसार माध्यमाचे प्रतिनिधीही चांगली भुमिका बजावत आहेत.पत्रकारांनीही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.केवळ अन् केवळ वृत्तसंकलनासाठीच त्या त्या महसूल मंडळाच्या ठिकाणी प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेच्या अनुषंगाने कार्यवाही च्या वेळी स्थानिक पत्रकार यांना उपस्थित राहता येईल .बातमी संकलन करेपर्यत फिरण्याची मुभा राहील असे तहसिलदार सुरेश घोळवे यांनी पत्रकार संघाच्या पदाधिकार्याशी बोलताना सांगितले .
गेल्या काही दिवसापुर्वी एका विभागीय दैनिकाच्या पत्रकाराला देवणीत प्रवेशास प्रशासनाकडुन अटकाव केल्याच्या चर्चेवरुन आज देवणीत सोशल डिस्टींग अंतर ठेवुन याविषयावर पत्रकारांची चर्चा झाली.शिवाय तहसिलदारांना निवेदनही देण्यात आले.सदर प्रकरणात संबधित अधिकारी व पत्रकार यांची एकमेकांना ओळख नसल्याने व बोलण्यात विसंगती झाल्याने हा प्रकार झाला.यापुढे अशा घटना टाळण्यासाठी पत्रकारांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात वृत्तसंकलन करताना आपल्या पेपरचे ओळखपत्र सोबत ठेवावे.यामुळे प्रशासनालाही ओळखणे सोयीचे होईल असेही प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. येत्या ३० जुलै पर्यत संचारबंदीचे उल्लंघन होणार नाही दक्षता सर्वानी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पत्रकार व व्यापारी यांची कोविड टेस्ट
लवकरच तालुक्यातील पत्रकार व व्यापारी यांची कोविड तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली असल्याची माहिती पत्रकार सतीश बिरादार तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,शाखा देवणी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.
0 Comments