Latest News

6/recent/ticker-posts

शिवचित्रकार कलायोगी जी कांबळे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना मागणी


शिवचित्रकार कलायोगी जी कांबळे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना मागणी


 


लातुर:(प्रतिनिधी) दि.-२२.०७.२०२० अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड जिल्हा शाखा लातुरच्या वतीने कालायोगी जी कांबळे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी अमित विलासराव देशमुख सांस्कृतिक मंत्री यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली आहे त्यासोबतच मा ना सतेज पाटील पालकमंत्री कोल्हापूर यांना ही पाठवण्यात आले आहे. 


सविस्तर वृत्त


सिनेमा पोस्टरच्या दुनियेतला सम्राट, कला पंढरीचा वारकरी, कोल्हापूर भूषण आणि पोस्टरचा बादशहा कलायोगी जी कांबळे चा जन्म २२जुलै१९१८ मध्ये अत्यंत गरीब हिंदू खाटीक कुटुंबात कोल्हापूर च्या मंगळवार पेठेत जन्म झाला, जेमतेम तिसरी पर्यंत शिक्षण घेतलेल्या कांबळे ना चित्रकलेची आवड मात्र बालपणापासून जोपासली. चित्रकलेच्या आवडीला त्यांनी बारीक निरीक्षण, स्वविचार आणि निर्माणशील मनाने प्रचंड मेहनत घेऊन तेही चित्रकलेचे कोणतेही प्राथमिक शिक्षण नसताना व कोणत्याही मान्यवर चित्रकाराचे मार्गदर्शन नसताना आपल्या अंगभूत गुणांवर व ईश्वरी सामर्थ्यावर विश्वास ठेऊन त्यांनी कलाक्षेत्रात स्वतः चे स्थान निर्माण केले त्यातूनच पोस्टर पेटिंगचा बादशहा म्हणून त्यांनी भारतभर सन्मान मिळवला हे एक आश्चर्य म्हणावे लागेल


दिल्लीत १९६० साली "मोगल ए आझम"चित्रपटाची जी कांबळे यांनी रेखाटलेली भव्य पोस्टर पेटिंग पाहून एलिझाबेथ राणीने आपल्या स्वागताची मिरवणूक काही वेळ थांबवली होती त्या इतक्या पोस्टर पेंटिंग वर प्रभावित झाल्या होत्या .भारतीय सिनेमा पोस्टरमध्ये जी कलात्मकता व भव्यता आली तिचा पाया कालायोगी यांनीच घालून दिला पोस्टर पेंटिंगला अभिजात कलेचा दर्जा प्रतिष्ठा आणि जागतिक किर्ती मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे,त्यांनी पोट्रेट पेंटींगच्या क्षेत्रातही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले


सतत पाच वर्षे अभ्यासपूर्वक बनविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या अस्सल तैलचित्राला शासनाची अधिकृत चित्र म्हणून राज मान्यता मिळाली आहे. या छत्रपतीच्या चित्राची तत्कालीन शासनाने रॉयल्टी देऊ केली होती पण त्यांनी देवाचे चित्र काढण्यासाठी पैसे घ्यावयाचे नसतात म्हणून त्यांनी ती स्वीकारली नाही


भारत सरकारने छत्रपती शिवाजी महाराज व राजश्री शाहू महाराज यांचे चित्रावरूनच पोस्ट स्टॅम्प प्रकाशित केले होते.राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. संतुजी लाड, पंडित जवाहरलाल नेहरू, अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी, रशियन नेते लेनिन, लाल बहादुर शास्त्री, रवींद्रनाथ टागोर, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, स्व मीनाताई ठाकरे अशा अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय थोर नेत्यांची, व्यक्तीची पोट्रेट पेंटिंग बनवण्याचा मान जी कांबळे ना मिळाला होता. मुंबई सचिवालय, महाराष्ट्र विधान भवन, मंत्रालय, विधान परिषद सभागृह, नागपूर विधानभवन, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कॅन्सस विद्यापीठ अमेरिका अशा अनेक ठिकाणी त्यांची तैलचित्र लागली गेली अमेरिकेत ही चित्रप्रदर्शन भरली. 


महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण,स्व बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर अशा अनेक मान्यवरांनी, नेत्यांनी त्याच्या घरी जाऊन सन्मानित केले आहे तर लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते कोल्हापूर भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते,त्याच्यावर अनेक वृत्तपत्रातून लिखाण करण्यात आले आहे त्यांचे दुःखद निधन झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री स्व विलासरावजी देशमुख यांनी "मनाची श्रीमती असलेला उमदा आणि प्रतिभावंत कलाकार आपण गमावला," अशी प्रतिक्रिया निधनाबद्दल वक्त केली होती. छत्रपती शिवरायांच्या त्यांनी रेखाटलेल्या तैलचित्राने त्यांना देशभर प्रसिद्धी मिळाली त्यांनी चित्रपटसृष्टीतील मोलाचे योगदान दिले, कला क्षेत्रातील त्यांचे योगदान सदैव स्मरण राहील, असे शोकसंदेशात श्रद्धांजली वाहिली होती ,पण अद्याप पर्यंत या महान चित्रकाराला महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले नाही मध्यतरी मागच्या सरकारच्या काळात ही मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली होती पण योग्य ती दखल घेतली गेली नाही कलायोगी जी कांबळे यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडचे साईनाथ घोणे, गणेश सौदागर, दिगंबर कांबळे, श्रीनिवास राजणकर, राजु बुये, गितेश राजणकर,रोहित रूमनणे, चैतन्य फिस्के, राज डोंगरे, नरेंद्र सौदागर,किरण कांबळे,बालाजी रत्नपारखे आदींनी केली आहे.


Post a Comment

0 Comments