लातूर येथील गुजर परिवाराने बनवली घरच्या घरी पर्यावरणपूरक गणेश मुर्ती
लातूर:(प्रतिनिधी) शिव नगर,पत्रकार रोड येथील सौ.वर्षा विजयकुमार स्वामी(सांडे) यांच्या मार्गदर्शनाखाली चि.ओमकार,अद्वैत व सौ.अनिता गुजर यांनी घरच्या घरी पर्यावरणपुरक गणेश मुर्ती तयार केली. कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक गणेश मुर्ती प्रतिष्ठापणेवर बंधन येण्याची शक्यता लक्षात घेवुन या वर्षी घरोघरी पर्यावरणपुरक मातीच्या गणेश मुर्ती बनवण्याची चळवळ सर्वत्र पाहायला मिळत आहे. यासाठी क्ले/शाडू मातीचा वापर करण्यात येतो. कुटूंबातील सर्व सदस्यांनी तन्मयतेने मग्न होवून गणेश मुर्ती बनवल्यामुळे खुप आनंद मिळत आहे खर्च कमी, रस्त्यावरुन मिरवणूक नाही, सजावट पण पर्यावरपुरक जसे झाडाची पाने,फुले,ईत्यादी वापर करून ,विसर्जन पण घरच्याघरी करता येईल. विसर्जना दिवशी बकेट मध्ये पाणी घेवुन त्यातच मुर्तीचे विसर्जन करुन तीच माती झाडाच्या कडेला टाकून पर्यावरण रक्षण होईल. ध्वनी,पाणी,प्रदूषन होणार नाही. ही चळवळ अधिक प्रमानात वाढल्यास मुर्ती खरेदीसाठी बाजारात सोशलडिस्टंगची पण वेळ येणार नसल्याचे सौ.अनिता गुजर यांनी "मराठी अस्मितेचा इशारा" प्रतिनिधीशी बोलताना म्हटले.
0 Comments